शाळेचे पाहिलं यशस्वी सत्र
पहिल्या वसंत ऋतूच्या (१ फेब्रुवारी ते १४ जून ) सत्रातील उपक्रम
शाळेचा शुभारंभ संपूर्ण नॉर्वे साठी १ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) झाला.
Stavanger, Bergen, Trondheim, Sandefjord, Oslo आणि Eidsvoll येथील एकूण १३० विद्यार्थ्यांचा मराठीबोली नॉर्वे शाळेमध्ये सहभाग झाला.
मराठी बोली नॉर्वे शाळेचे १८ इच्छुक विद्यार्थ्यांचा सहभाग अमेरिकेच्या BMM शाळेच्या २०२५ च्या परीक्षेत झाला आणि ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया १ फेब्रुवारी ते १४ जून सत्रासाठी खालील वयोगट नुसार निश्चित केली गेली :-
शिशु वर्ग: ४ ते ६ वर्षे वयाचे विद्यार्थी.
बाल वर्ग :- १ ली ते ४थी – ६–१० वर्षे वयाचे विद्यार्थी.
किशोरवयीन:- ६ वी ते ८ वी – ११–१६ वर्षे वयाचे विद्यार्थी.
दर शनिवार: **ऑस्लो आणि स्टॅव्हांगर येथे ऑफलाइन मराठी शाळेचे वर्ग चालवले गेले.
**आणि इतर सर्व ठिकाणांसाठी प्रत्येक इयत्तेनुसार ऑनलाईन वर्ग उपलब्ध होते.
सोमवार ते शुक्रवार: १५ मिनिटांचे ऑनलाइन मराठी वर्ग, दररोज संध्याकाळी दोन वेळांमध्ये उपलब्ध होते. ( वेळ 5.30-5.45/ 8.00-8.15 pm)