येणारे शैक्षणिक वर्ष हे वार्षिक प्रवेश पद्धतीने जून २०२६ पर्यंत असेल.
प्रवेश प्रक्रिया आणि वेळापत्रक :-
विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया खालील वयोगट नुसार निश्चित केली जाईल.
शिशु वर्ग: ४ ते ६ वर्षे वयाचे विद्यार्थी.
बाल वर्ग :- १ली ते ४थी – ६-१० वर्षे वयाचे विद्यार्थी.
किशोरवयीन:- ६ वी ते ८ वी – ११-१६ वर्षे वयाचे विद्यार्थी.
शाळेचे वेळापत्रक :-
गुरुवार आणि शुक्रवार: १५ मिनिटांचे ऑनलाइन मराठी शाळेचे वर्ग गुरुवार आणि शुक्रवार ह्या दिवशी दोन सत्रात
म्हणजेच दोन वेळांमध्ये असतील.
दर शनिवार: **ऑस्लो आणि स्टॅव्हांगर येथे ऑफलाइन मराठी शाळेचे वर्ग चालवले जाईल.
**आणि इतर सर्व ठिकाणांसाठी प्रत्येक इयत्तेनुसार ऑनलाईन वर्ग उपलब्ध असतील.
सत्र शुल्क –
सत्र शुल्क हे एका सत्रापर्यंत विद्यार्थ्यांच्या नोंदणी admissions, पुस्तकाची किंमत, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि सहली, संग्रहालये भेट आणि सुविधांच्या खर्चासारख्या इतर नियोजित क्रियाप्रकल्पावर अवलंबून असेल .
सत्र शुल्क/ Fees – हे एका सत्रा मध्ये ,प्रति विद्यार्थी 20-25 क्रोनर प्रति वर्ग ह्या धरती वर आकारला जाईल.परंतु परतफेड करण्याच्या आधारावर नाही.