Trpt
Trupti Shrivardhankar

शाळा: सरस्वती विद्या मंदिर घाटकोपर, मुंबई

शिक्षण: मेकॅनिकल इंजिनीरिंग

मी त्तृप्ती श्रीवर्धनकर यंत्र अभियांत्रिकीच्या पदवीधर आहे. मूळची कोकणातली आणि मुंबईची.मराठी मातृभाषा हि फक्त एक भाषा नाही तर ती आपल्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा भाग आहे असं मला वाटतं .माझे भाषाप्रेमाचे ध्येय मराठी भाषेच्या अभिमानातून उगम पावले आहे. माझी एकच  छोटीशी इच्छा होती — की माझी मुले कधी ना कधी शिवाजी महाराज मराठीतून वाचतील, पु. ल. देशपांडे कसे सुरेल मराठीत बोलत असत हे ऐकतील, त्याचा अर्थ समजून खळखळून हसतील. भारतात गेल्यावर रस्त्यांवर, फलकांवर किंवा आजूबाजूला जे काही देवनागरीत लिहिलेले असेल ते सहज वाचतील आणि त्यात आपलेपणा अनुभवतील.बास मग काय ही इच्छा  मनात ठेवली आणि मी ज्या देशात राहते  — नॉर्वे — तिथे  मराठी भाषेच्या शाळेची संकल्पना मांडली आणि ही  संकल्पना कृतीतही  उतरवण्यासाठी ह्या  ध्येयामध्ये सहविचाराचे  सहभागी  एकत्र येऊन  एका सुंदर व प्रगल्भ  मराठीबोली नॉर्वे  शाळेची निर्मिती प्रत्यक्षात आली.आज नॉर्वेतील कोणत्याही शहरात राहणाऱ्या मराठी कुटुंबातील मुलांना मराठी शिकणे उपलब्ध आणि सुलभ झाले आहे — या कार्यामुळे परदेशात वाढणाऱ्या पिढ्यांनाही मराठीची गोडी लागते आहे, संस्कृतीशी नाते घट्ट होते आहे.ह्या कार्यासाठी निगडित सर्व पालकांचे आभार !!

Nmrta
Namrata Kulkarni

मी नम्रता कुलकर्णी, मूळची जुन्नरची असून पुण्यात वाढले आहे. ही दोन्ही ठिकाणं म्हणजे मराठीशी घट्ट नाळ जोडून धरणाऱ्या जागा आहेत. माझ्यासाठी ती फक्त एक भाषा नाही, तर माझ्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे.माझी पार्श्वभूमी कला आणि नाट्य क्षेत्रातला असल्यामुळे मराठी भाषेशी माझं जिव्हाळ्याचं नातं आहे.मराठीत बोलणं, लिहणं आणि काम करणं मला नेहमीच आपलं वाटतं. नॉर्वेमध्ये राहत असताना मी पाहिलं की इथल्या मराठी मुलांना आपल्या भाषेशी आणि संस्कृतीशी जोडणं खूप गरजेचं आहे. इथेच ‘मराठी बोली शाळा’चा महत्त्वाचा रोल आहे. या शाळेत मुलांना त्यांच्या मुळांशी जोडून ठेवण्याचं खूप छान काम केलं जातं.मी ह्या शाळेशी शिक्षिका म्हणून जोडले गेले कारण मला वाटतं की आपण आपल्या मुलांना मराठी शिकवणं हे फक्त भाषा शिकवणं नाही, तर त्यांना त्यांच्या कुटुंबाशी, संस्कृतीशी आणि ओळखीशी जोडणं आहे. हे काम मला मनापासून महत्त्वाचं वाटतं.

 

Sapna
Sapna Dalal

शाळा : IES राजा शिवाजी विद्यालय / सुभेदार वाडा.

शिक्षण : भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी
मराठी ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत आणि मातृभाषा आहे. ती आपली ओळख, आपली संस्कृती, आपले संस्कार आणि आपल्या अस्मितेचे प्रतीक आहे. आपले विचार, भावना आणि परंपरा व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे मराठी शिकणे आणि शिकवणे हे आपल्यासाठी केवळ गरजेचेच नव्हे, तर अभिमानास्पदही आहे.मराठी येत असल्यामुळे मुले घरातील आजी-आजोबा, इतर कुटुंबीय व शेजाऱ्यांशी अधिक चांगले संवाद साधतात.मराठीबोली शाळेच्या माध्यमातून परदेशात – नॉर्वेमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलांना आपल्या भाषेची, संस्कृतीची ओळख व्हावी आणि आपल्या भाषेचा अभिमान असावा. हीच माझी इच्छा आणि प्रयन्त असणार आहे..मराठीत बोलणं, लिहणं आणि काम करणं मला नेहमीच आपलं वाटतं. नॉर्वेमध्ये राहत असताना मी पाहिलं की इथल्या मराठी मुलांना आपल्या भाषेशी आणि संस्कृतीशी जोडणं खूप गरजेचं आहे. इथेच ‘मराठी बोली शाळा’चा महत्त्वाचा रोल आहे. या शाळेत मुलांना त्यांच्या मुळांशी जोडून ठेवण्याचं खूप छान काम केलं जातं.मी ह्या शाळेशी शिक्षिका म्हणून जोडले गेले कारण मला वाटतं की आपण आपल्या मुलांना मराठी शिकवणं हे फक्त भाषा शिकवणं नाही, तर त्यांना त्यांच्या कुटुंबाशी, संस्कृतीशी आणि ओळखीशी जोडणं आहे. हे काम मला मनापासून महत्त्वाचं वाटतं.

 

Suchta
Suchita Turankar

शाळा: होली क्रॉस मराठी विद्यालय, अमरावती

शिक्षण: इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग डीप्लोमा

परदेशात राहणाऱ्या मराठी कुटुंबांसाठी मराठी शाळेचे महत्त्व खूप मोठे आहे. घराबाहेर मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी मराठी शाळा मुलांना एक व्यासपीठ देते आणि मराठी बोली॓ नॉर्वे शाळेचा भाग असलयाचा मला आनंद आहे.

परदेशात मराठी मुलांसाठी मराठी शाळा म्हणजे केवळ शिकवण्याचे ठिकाण नसून, ती संस्कृती टिकवण्याचे ठिकाण आहे. मुलांना मातृभाषेत विचार करण्याची सवय लावण्यासाठी आणि आपल्या मूळ ओळखीशी जोडून ठेवण्यासाठी मराठी शाळा खूप महत्त्वाची आहे

Gansh
गणेश तिगडे

जरी मी अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि नंतर व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असलं, तरी माझी खरी ओळख ही कोंकण आणि सह्याद्रीच्या रानात उमललेल्या एका रानफुलासारखी आहे.

नॉर्वेमध्ये राहूनही माझ्या मनात मराठी संस्कृतीची, भाषेची आणि मातीची ओढ कधीच कमी झाली नाही. हीच ओढ मला मराठी शाळेत शिक्षक आणि स्वयंसेवक म्हणून जोडून गेली. माझ्या मुळांशी नातं टिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढीला आपल्या भाषेचं सौंदर्य अनुभवता यावं, यासाठी मी हा प्रवास सुरू केला.मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर ती एक हजार वर्षांची समृद्ध साहित्यपरंपरा लाभलेली संस्कृती आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, प. के. अत्रे, पु. ल. देशपांडे आणि अशा असंख्य थोर साहित्यिक, विचारवंत, कवी आणि समाजाला उन्नत करण्याऱ्या महानुभावांनी या भाषेला स्पर्श करून ती अधिकच तेजस्वी केली आहे.

माझं एक स्वप्न आहे – आपल्या मराठी शाळेतून एक दिवस असा एक विद्यार्थी घडावा, जो या अमूल्य मराठी साहित्याचा काही अंश नॉर्वेजियन किंवा इतर युरोपीय भाषांमध्ये स्वैरानुवादित करेल. यामुळे केवळ दोन भाषा नव्हे, तर दोन खंडांतील समाज आणि संस्कृती एकमेकांशी जोडल्या जातील. ही केवळ भाषेची देवाणघेवाण नसेल, तर ती हृदयांची आणि विचारांची देवाणघेवाण असेल.

 

Picture 1
सौं रंजना गणेश तिगडे

मी मूळची महाराष्ट्रातील ठाणे येथील आहे. फार्मसी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मी नॉर्वेमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे.

नॉर्वेतील शिक्षण व्यवस्थेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना तृतीय भाषा ऐच्छिक स्वरूपात निवडता येते. या पर्यायामध्ये तामिळ, अरबी आणि इतर काही मातृभाषांचा समावेश असतो. ही माहिती मिळाल्यावर माझ्या मनात विचार आला – “आपली मराठी भाषा देखील या स्तरावर का शिकवली जाऊ नये?”याच प्रेरणेतून मला मराठी बोली शाळा या उपक्रमाची माहिती मिळाली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि आपल्या संस्कृतीशी पुढच्या पिढ्यांना जोडून ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपक्रम आहे, असे मला वाटले. मी तत्काळ स्टावांगर विभागाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली.

मला लोकांच्या सान्निध्यात राहायला खूप आवडते आणि मराठी बोली शाळेमुळे ही संधी मला सहज उपलब्ध झाली आहे. या कार्यातून मला आत्मिक समाधान मिळते आणि वेळाचाही सदुपयोग होतो, असे प्रकर्षाने जाणवते.माझ्या मोकळ्या वेळेत मला यूट्यूबसाठी व्हिडीओ तयार करणे, बागकाम करणे आणि भटकंती करणे यांचा विशेष आनंद मिळतो.

Kalni
सौ. कल्याणी अभिजित गारखेडकर

शिक्षण: B.Sc , MCM , PPU

​​गेल्या सात वर्षांपासून नॉर्वे मध्ये शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, सध्या शिक्षक म्हणून काम करत आहे. मराठी ही माझी मातृभाषा असून,  परदेशात राहणाऱ्या मुलांना हा भाषेचा ठेवा आणि मेवा देण्याची इच्छा  या मराठीबोली शाळेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा हा एक माझा छोटासा प्रयत्न आणि प्रेरणा सुद्धा !

परदेशात राहणाऱ्या मुलांना मराठी शिकवणं म्हणजे त्यांना आपल्या आजी-आजोबा, नातेवाईक आणि मूळ गावाशी भावनिक नातं जोडण्याचे साधन आहे असे मला वाटते. त्यामुळे, परदेशस्थ

प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या मुलांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न जरूर करावा – घरात, शाळांमध्ये किंवा ऑनलाइन माध्यमांतून. ही गुंतवणूक त्यांच्या संस्कृतीशी असलेल्या नात्याला बळकटी देईल आणि त्यांना अधिक सशक्त व्यक्तिमत्त्व मिळवून देईल यात शंका नाही.

 

Prful
प्रफुल्ल म्हात्रे

शाळा: चेंबूर हायस्कूल, मुंबई

शिक्षण: मेकॅनिकल इंजिनीरिंग

मराठी भाषा नॉर्वे मध्ये शिकवली जाणे ही कल्पनाच स्तुत्य होती आणि इतर शिक्षकांप्रमाणे मी पण प्रेरीत होणे साहजिक होते. नॉर्वे मधली मराठी मुले मूळात आपआपल्या घरात मातृभाषेचा शक्य असेल तसा प्रयत्‍नही करत होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, नॉर्वेजियन आणि अजून एक युरोपियन भाषा; हया सगळ्यात गोंधळ होणे आलच. मुलांची सांस्कृतिक आवड महाराष्ट्र मंडळ जरी काही अंशी पूर्ण करत असेल तरी मराठी लिहिणे आणि वाचणे हे दुरच होते. मुले Polyglot होउन समृद्ध होण्यासाठी माय भाषेची पकड क्रमप्राप्‍त आहेच.

शिक्षक होणे, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे, त्यांना प्रेरित करणे आणि त्यांच्या यशात सहभागी होणे हया आनंददायी आणि उत्साही कार्यात सहभागी होताना एक विशेष आनंद आहे.

पुढच्या वर्षी आपल्या बाल कलाकार मुलांना मराठी लिपीत नाटक आणि कविता देता येइल ही आशा आहे.सगळ्या शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांना मना पासुन शुभेच्छा!!

Rupali
रुपाली म्हात्रे

शाळा: सर एस ए हायस्कूल मुरुड जंजिरा

शिक्षण: साहित्य कला पदवी, प्राथमिक शिक्षक

प्राथमिक शिक्षक म्हणून मुलांच्या संगोपना साठी काम करत असताना भारतात सुद्धा क्वाचितच मराठी भाषा शिकवली जात होती. लहान मुलांबरोबर रमताना चिउ काउच्या गोष्टी आणि बडबड गीते विशेषत: मनात रुंजी घालत होत्या.

नॉर्वे मध्ये बालवाडीत नॉर्वेजियन भाषेत मुलांना खुप छान बडबड गीते शिकवली जातात. मराठी शाळेत तर हया सगळया बरोबरच प्रभु राम चंद्राच्या कथांसह पंचतंत्राच्या गोष्टी पण शिकवल्या जातील. पालकांना पण मुलांशी संवाद करताना खूप आनंद आणि अभिमान वाटेल ह्याची खात्री आहे.विद्यार्थ्यांच्या मनात मराठीबद्दल आवड निर्माण करणे आणि त्यांच्या जिज्ञासा वाढवणे हे काम तसे जिकरीचे आहे पण माझ्या सोबतच्या सहकारी शिक्षकांमुळे हे सहज शक्य होत आहे.

default.png
केतकी धारे

शाळा: माउंट कार्मेल गर्ल्स स्कूल, नागपूर

शिक्षण: बी. आर्किटेक्चर;  प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर.

नॉर्वेमध्ये असताना, मी माझ्या मुलीला घरी मराठी शिकवत आहे, तिला ही सुंदर आणि उत्कृष्ट भाषा समजून घेण्याची खात्री करून देत आहे. हे तिला आपल्या समृद्ध वारसा आणि संस्कृती वाचून आपल्या मुळांशी जोडण्यास मदत करते. मराठी बोली शाळा केवळ मुलांना जोडत नाही तर त्यांना मातृभाषेत संवाद साधण्यासाठी एक सामान्य माध्यम देखील देते. मला आनंद आणि सन्मान आहे की मला आपल्या मातृभूमीपासून दूर आपल्या भावी पिढीला आपली मातृभाषा शिकवण्याची रोमांचक संधी मिळाली. हे मला माझ्या देशाची लहानशी सेवा करण्याची संधी देते.

आम्ही एक टीम म्हणून काम करतो आणि विविध कार्यात्मक / प्रशासकीय समस्यांचे निराकरण करण्याची खात्री करतो. शाळेत येणाऱ्या मुलांसाठी भाषा मित्र बनवण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत.  त्यांनी शिकायला प्रेम आणि प्रयत्न करण्यासाठी पुरेसे खेळ केले आहेत.  या वर्षाच्या सुरुवातीच्या वर्गांच्या अनुभवावरून, मुलांना शाळेबद्दल आपुलकी वाटते कारण त्यांना मातृभाषेचा आराम, त्यांचे लोक सापडतात, त्यामुळे ते अधिक उत्साहाने प्रतिसाद देतात.

आम्ही अजूनही आमच्या लक्ष्य आणि मराठी भाषा वटवृक्ष लावण्याच्या दृष्टिकोनापासून मैल दूर आहोत, लवकरच तिथे पोहोचू.

Ashwni
अश्विनी जाधव

शाळा : अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, मुंबई. (नावात इंग्लिश असलं तरी शाळा मराठीच आहे)

शिक्षण : स्थापत्य अभियांत्रिकी

माझे शिक्षण जरी अभियांत्रिकी मधले असले तरी ते फक्त पोटापाण्यासाठी, खरी नाळ जोडली गेली आहे ती कलेबरोबर. मुख्याद्यापक दाम्पत्याची नात असल्यामुळे लहानपणापासूनच मराठी साहित्याचे आणि कलेचे बाळकडू मिळाले.

तोच वारसा आता माझ्या मुलींमध्ये यावा ही मनापासून ईच्छा आहे. जरी त्या नॉर्वेजिअन शाळेत शिकत असल्या तरी त्यांना नीट मराठी लिहिता-वाचता-बोलता यावे, मातृभाषेतून सुसंवाद घडावा, मराठी साहित्याची गोडी लागावी यासाठी इथे नॉर्वे मध्ये त्यांना घरी मराठी शिकवायला सुरुवात केली. 

मराठीबोली शाळेमुळे इतर मुलांनासुद्धा मराठी शिकवायची सुवर्णसंधी मिळाली. तिथे येणाऱ्या मुलांची मराठी शब्दसंपदा वाढवणे, त्यांच्या वयानुरूप मराठी साहित्याशी त्यांची ओळख करुन देणे ह्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. मातृभाषेतील सुसंवादामुळे भारतात आजी आजोबां बरोबर, ईतर नातेवाईकांबरोबर सुद्धा ह्या मुलांचे नाते अधिक दृढ होईल.

भाषेबरोबरच मराठी रंगभूमी, लोककला ह्यांची मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी हे स्वप्न आहे. जेणेकरून भविष्यात इथे नॉर्वे मध्ये सुद्धा आपला सांस्कृतिक वारसा जपला जाईल.

RpaliP
सौ. रूपाली सुमित प्रधान.             

 शिक्षण : B.Com, L.L.B. , Inter CA

माझ्या जन्म आणि शालेय शिक्षण गुजरात मध्ये आणि गुजराती माध्यमात आणि उच्च शिक्षण इंग्रजी मध्ये झाले. त्या वेळी मराठी भाषेशी माझे नाते, मातृभाषा असून घरात बोलण्या इतके च असे. पण भाषा कुठली ही असो गणित पेक्षा सगळ्या भाषेत मला उत्कृष्ट मार्क मिळायचे. मराठी भाषे सोबत पक्की मैत्री जुळली ती लग्ना नंतर वाचन वेडा जोडीदार भेटल्यावर. जशी जशी पुस्तकांच्या जगात मी हारवत गेले तशी तशी अधिकच मराठी भाषेची गोडी लागली.

२०१८ मधे नोर्वला आल्या नंतर अधिक मोकळा वेळ मिळू लागला तसे जमेल असा वाचनाचा वेग वाढला. शाळेच्या वक्तृत्व स्पर्धा जिंकण्या पासून ते नोंर्वे मध्ये निवेदिका म्हणून झालेली ओळख चा साहित्यिक प्रवास खूप रुचकर ठरला. “शब्द” ही माझी ताकत आहे असे मला वाटते. मला वाचन सोबत लिहायची आणि चित्रकामाची ही आवड आहे. लहान मुलांच्या भावविश्वात रमायला मला खूप आवडते. त्यांच्या कडे आयुष्या कडे बघण्याचा एक निरागस वेगळाच दृष्टिकोण असतो आणि त्यात आपल्यालाही बरच काही शिकायला मिळतो. “वाचाल तर वाचाल” ह्या वाक्यात आयुष्याचे खूप मोठे गूढ दडलेले आहे हे मी माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवले आहे. हेच माझ्या विध्यार्थीयानं सुद्धा पटवून द्यायचे आहे.

परदेशात वाढणारी ही नवीन पिठी आपला पांपरिक वसा पुढे नेऊ शकेल त्या साठी लागेल ते प्रयत्न करायला मी तयार आहे. मातृभाषे सोबतचे भावनिक नाते टिकून राहावे आणि अधिक समृद्ध ह्वावे त्या ध्येयान् सुरू झालेल्या शाळेचा मी भाग आहे ही माझे भाग्य. मराठी बोली नोर्वे शाळेची शिक्षिका म्हणूनची सुरवात उत्तम झाली आहे. ह्या संस्थे सोबत जोडून घेतल्या बदल मी माझी मैत्रीण सौ. रंजना तिगडे ची आभारी आहे. 

Prdarshni
प्रियदर्शिनी वैशंपायन

शाळा: बालमोहन विद्यामंदिर, दादर, मुंबई

शिक्षण: IT इंजिनियर (B.E.I.T)

माझे बालपण हे अगदी मराठमोळ्या भागात म्हणजेच दादर, मुंबई मधे गेले. घरात शिक्षकांचा वारसा असल्यामुळे लहानपणापासूनच मराठी साहित्याचे बाळकडू मिळाले. त्यात शाळेमार्फत सुद्धा अनेक मराठी कला आणि नाट्य उपक्रमांमधे मी सहभाग घेत असे. त्यातूनच मराठी भाषेशी माझं जिव्हाळ्याचं नातं घट्ट होत गेल. मराठी ही केवळ भाषा नाही, ती माझी ओळख आहे. तिच्या शब्दाशब्दांत माझं बालपण, आठवणी, संस्कार दडले आहेत. मराठी भाषा समजून घेणं म्हणजे आपली संस्कृती ओळखणं असं मी मानते. माझ्या मातृभाषेवर माझे मनापासून प्रेम आहे. मराठी साहित्य, कविता आणि संतवाङ्मय मला नेहमीच आकर्षित करत आले आहे. विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागावी आणि त्यांच्यात भाषेबद्दल अभिमान निर्माण व्हावा, हाच माझा हेतू आहे. शिक्षिका म्हणून मी माझ्या भाषेचा प्रचार व प्रसार करू शकते, हेच मला प्रेरणा देणारे ठरले. मराठी शिकवताना मला खूप आनंद मिळतो. विद्यार्थ्यांना चांगली मराठी बोलता, वाचता आणि लिहिता यावी, हे माझे ध्येय आहे.

नॉर्वेमधली आपली ही मराठी शाळा हेच ध्येय ठेऊन पुढे वाटचाल करत आहे. ह्यात मी माझे योगदान देऊ शकते ह्याचे खूप समाधान वाटते.

default.png
अमोल श्रीवर्धनकर

मी, अमोल श्रीवर्धनकर, मूळचा मुंबईचा असून गेली १९ वर्षे नॉर्वेमध्ये स्थायिक आहे. मातृभाषेचे संवर्धन आणि पुढील पिढीला मराठी भाषा शिकविणे हे आपले कर्तव्य आहे, ही जाणीव ठेऊन मी मराठीबोली नॉर्वे शाळा या उपक्रमाशी जोडलेलो आहे.

ही शाळा केवळ एक घरगुती स्वरूपात घेतले जाणारे गटशिक्षणसारखी नसून एक सुस्थित व नीट आखलेली शैक्षणिक प्रणाली वापरून मुलांना मराठी शिकवते. हा उपक्रम अत्यंत निःस्वार्थी, नि:स्वलाभ आणि खरोखरच स्तुत्य असा आहे.

या शाळेच्या कार्यपद्धतीने आणि मूल्यांनी मी भारावून गेलो आहे,कारण हि शाळा  मुलांना आपुलकीच्या वातावरणात, भाषेचा गाभा समजून घेण्याची संधी देते .मी या उपक्रमात आर्थिक व्यवस्थापनाच्या माध्यमातून सहभागी असून, अशा उपक्रमांना स्थैर्य आणि विस्तार मिळावा, यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. माझ्या या योगदानाद्वारे शाळेला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आणि त्याचा फायदा हा अधिकाधिक विद्यार्थ्यांना  मिळेल, असा मला विश्वास आहे.मराठी भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवण्याच्या या कार्याचा भाग होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

Scroll to Top