Skip to content
शाळेचा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आहे आणि सुलभ भारती पुस्तकांवर आधारित आहे . सुलभ भारती विशेषतः मराठीचे पूर्वज्ञान नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे . या अभ्यासक्रमात भाषेच्या मूलभूत संकल्पनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे , जे हळूहळू भाषा कौशल्ये विकसित करेल आणि सर्व वयाच्या विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा अनुभव परस्परसंवादी आणि गुंतवून ठेवणारा असेल . मराठी बोली शाळा नॉर्वेमधील कोणत्याही शहरातल्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी खुली आहे . मुख्यतः ही शाळा ऑस्लो आणि स्तवांगर या ठिकाणी ऑफलाइन वर्ग म्हणून चालवली जाईल . Oslo Stavanger शहरां व्यतिरिक्त इतर शहरांसाठी सगळे शिक्षण ऑनलाईन चालवले जाईल . शाळेने महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा पद्धतीचे पालन केले आहे आणि १ ली ते ८ वी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली परीक्षा मे २०२६ मध्ये आयोजित केली जाईल . महाराष्ट्र शासनाची वार्षिक परीक्षा ऐच्छिक असेल . उद्दिष्ट्ये – मराठी वाचन , लेखन आणि व्याकरणात प्रावीण्य मिळवणे संस्था संरचना – शाळेतील पदांसाठी उमेदवारांची भरती खुले निवड प्रक्रियेने केली जाते , ज्यामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभाग घेण्याची संधी उपलब्ध आहे . मराठीबोली नॉर्वे शाळा ही नॉर्वेमधील नोंदणीकृत ना – नफा संस्था आहे . या संस्थेमध्ये कार्यरत सर्व स्वयंसेवक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यासाठी निःस्वार्थपणे योगदान देतात , आणि त्यांना कोणताही वैयक्तिक आर्थिक लाभ दिला जात नाही .
शाळेची वैशिष्ट्ये