मराठीबोली नॉर्वे शाळा माहिती 
मराठीबोली नॉर्वे शाळा २०२४ मध्ये ओस्लो येथे सुरु झाली ,  त्यातुन आलेल्या अनुभवानुसार,
भारता बाहेरच्या, भारतीय वातावरणात नसणाऱ्या मुलाना त्यांच्या वयोगटाला योग्य असा आणि अनुभवी
 जाणकारांनी  बनवलेला अभ्यासक्रम मिळणे जरुरीचे आहे ह्याची आवश्यकता भासली आणि हेच अनुभवी
जाणकार म्हणजे BMM शाळा ह्यांच्या सहकार्याने ती पूर्ण ही  झाली.
अश्याप्रकारे मराठीबोली नॉर्वे शाळा जानेवारी २०२५ मध्ये BMM शाळेसह जोडली गेली आणि त्याच सोबत महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यक्रमाचा अवलंब केला गेला .
“ मुलांनी हसत खेळत मराठी भाषा शिकावी आणि आपले संस्कार आणि संस्कृती पुढच्या पिढीने
जोपासावी हाच मराठी शाळेचा हेतू आहे .”
मराठीबोली नॉर्वे शाळेची वैशिष्ट्ये :-
शाळेचा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आहे आणि सुलभ भारती पुस्तकांवर आधारित आहे.
  सुलभ भारती विशेषतः मराठीचे पूर्वज्ञान नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे.
  या अभ्यासक्रमात भाषेच्या मूलभूत संकल्पनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जे हळूहळू भाषा कौशल्ये विकसित करेल आणि
   सर्व वयाच्या विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा अनुभव interactive and engaging असेल.
  मराठी बोली शाळा  नॉर्वेमधील कोणत्याही शहरातल्या  सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
  मुख्यतः ही शाळा ऑस्लो आणि स्तवांगर या ठिकाणी ऑफलाइन वर्ग म्हणून चालवली जाईल.
  Oslo ,Stavanger शहरां व्यतिरिक्त इतर शहरांसाठी सगळे शिक्षण ऑनलाईन चालवले जाईल.
  शाळेने महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा पद्धतीचे पालन केले आहे आणि
   १ली ते ८वी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली परीक्षा मे २०२६ मध्ये आयोजित केली जाईल.
  महाराष्ट्र शासनाची वार्षिक  परीक्षा ऐच्छिक असेल.
  उद्दिष्ट्येमराठी वाचन, लेखन आणि व्याकरणात प्रावीण्य मिळवणे.

  संस्था संरचनाशाळेतील पदांसाठी उमेदवारांची भरती खुले निवड प्रक्रियेने केली जाते,
   ज्यामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभाग घेण्याची संधी उपलब्ध आहे.
BMM शाळा पार्श्वभूमी 
  २००९ साली फिलाडेल्फिया इथे झालेल्या अमेरिकामधील BMM च्या अधिवेशनामध्ये मराठी शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली.
  शिक्षणक्षेत्राचा अनुभव असलेल्या मान्यवरांनी  मिळून,भारताबाहेर राहणाऱ्या मुलांनी मराठी शिकणे किती आवश्यक आहे हे
  जाणून सात ठिकाणी शाळा सुरु केल्या. शाळा म्हंटलं की त्यासाठी प्रत्येक इयत्तेनुसार निश्चित असा अभ्यासक्रम असायलाच हवा.
  याच भावनेतून शिक्षकांनी मिळून सखोल अभ्यासक्रम तयार केला.  पुणे येथील भारती विद्यापीठ संस्थेकडून हा अभ्यासक्रम
  तपासून घेतला गेला आणि त्याला अधिकृत मान्यता प्राप्त केली . अश्याप्रकारे अनेक वेगवेगळ्या अमेरिकामधील शहरांमध्ये
   मराठी शाळा सुरु झाल्या.
       BMM शाळेचे पुढचे पाऊल 
२०२3 मध्ये  BMM शाळेच्या स्वयंसेवक यांच्या एकत्रित प्रयत्नाने, BMM आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये करार झाला.
   ह्या कराराप्रमाणे अमेरिकामधील BMM शाळेमध्ये २०२४-२५ पासून पुढे बालभारती अभ्यासक्रम शिकवला गेला.
  २०२४ च्या आकडेवारीनुसार उत्तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आणि युनायटेड किंग्डम, डेन्मार्क,नॉर्वे  या सहा  देशात मिळून
  एकूण१०० शाळा सुरु आहेत. या शाळांमधून प्रत्येक इयत्तेनुसार पद्धतशीर शिक्षण दिले जाते. शाळा ही पूर्णपणे
  स्वयंसेवकांमार्फत चालवली जाते. त्याबदल्यात त्यांना कुठलाही आर्थिक मोबदला मिळत नाही.
       ऑगस्ट २०२५ पासून युरोप मध्ये ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क जुटलँड येथे देखील BMM उपक्रमातून मराठी शाळा सुरु होणार आहेत
मराठीबोली नॉर्वे शाळेची धोरणे
  • मराठी शाळेसाठी राष्ट्रीय शाळेच्या सुट्ट्या कॅलेंडरचे पालन केले जाईल.
  • शाळेशी संबंधित सर्व प्रश्न कृपया फक्त खालील ईमेलवर पाठवा :- mbs.Norge@gmail.com.
  • शिकवणी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची बक्षिसे दिले जाणार नाही.
  • फेब्रुवारी २०२५ पासून शाळेच्या नाममात्र शुल्काची अंमलबजावणी केली जाईल.
  • विद्यार्थ्यांबद्दल कोणतेही मुद्दे पालक व शिक्षकांमध्ये आयोजित पालक-शिक्षक बैठकांमध्येच चर्चिले जातील.
  • जर एखादा विद्यार्थी शाळेचा निरोप घेत असेल, तर पालकांनी ईमेलद्वारे सूचना द्याव्यात.
  • वेळेवर आगमन महत्त्वाचे आहे. तसेच मराठी वर्गांसाठी विद्यार्थ्यांना वेळेवर सोडणे आणि घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • हवामानाच्या स्थितीनुसार Outdoor activity आयोजित केले जातील.
  • पालक-शिक्षक संवाद फक्त पालक-शिक्षक बैठकीत होईल.
  • प्रत्येक वर्गाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल.
  • प्रत्येक वर्ग दीड तास चालेल, ज्यामध्ये दोन लहान विश्रांती असतील.
  • विद्यार्थ्यांचे कालानुसार मूल्यांकन केले जाईल.
  • पालक-शिक्षक बैठकांचे आयोजन वेळोवेळी केले जाईल.                                                                         सर्व वयाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेच्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रकल्प आयोजित केले जातील, ज्या मध्ये कविता वाचन, श्लोक, गोष्टींचे वाचन, मराठी पारंपरिक दिवस साजरे करणे, आणि मराठी
मराठी शिकण्यासाठी कौटुंबिक सहकार्य 
प्रिय पालक,
  • कृपया आपल्या मुलांना घरात मराठी बोलण्यास प्रोत्साहन द्यावे.
  • आपल्या मुलांना दररोज ५ नवीन मराठी शब्द शिकवण्यास मदत करावी.
  • कृपया आपल्या मुलांना सुट्टीच्या दिवशी श्लोक म्हणण्यास किंवा गोष्ट सांगण्यास प्रोत्साहित करावे.
  • वाचन आणि लेखनासाठी अक्षर अ‍ॅप्सचा वापर करावा .
  • गृहपाठ आणि पुनरावलोकन आपल्या मुलाच्या शिकण्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
  • नियमित हजेरी महत्त्वाची आहे, कृपया मुलांना शाळेत वेळेवर पाठवावे.
  • कृपया आपल्या मुलासोबत नाश्ता, फळं आणि पाण्याची बाटली पाठवावी.
  • अतिरिक्त वर्कशीट्स आणि गृहपाठ ईमेलद्वारे पाठवले जातील; कृपया ते आपल्या मुलांनसाठी प्रिंट करून दयावी.
  • कृपया आपल्या मुलांना पेन्सिल, रबर, स्केच पेन्सिल इत्यादी साहित्य सोबत द्यावे.
  • कृपया पूर्ण केलेले सर्व वर्कशीटस फोल्डरमध्ये एकत्र करून ठेवावेत, जेणेकरून नंतर तपासता येतील.आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

दररोज 15 मिनिटे ऑनलाइन शिकवण्याचे महत्त्व 

  • वास्तविक अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी, सर्व वयाच्या गटातील विद्यार्थ्यांना मराठी अक्षरे आणि अंकांची मूलभूत माहिती शिकवली जाईल.
  • प्रत्येक सोमवार ते शुक्रवार १५ मिनिटांच्या सत्रामुळे मराठीची ओळख हळूहळू आणि तणावमुक्त पद्धतीने होईल.
  • दैनिक १५ मिनिटांच्या शिकवणी आणि पुनरावलोकनामुळे एक सोयीस्कर आणि आनंददायक शिक्षण वातावरण तयार होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
  • ऑनलाइन वर्गांमध्ये मुलांना प्रेरित आणि गुंतवून ठेवण्यासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक आहे.

शिशु वर्ग

  • बालभारती नी आखलेल्या अभ्यासक्रमानुसार शाळेत शिकवले जाते.
  • ज्याच्यात BMM चा अभ्यासक्रम सुद्धा समाविष्ट आहे.
अभ्यासक्रमानुसार शिक्षकांनी बनविलेल्या अनेक मजेशीर उपक्रम त्यांच्या किशोरवयीन वयाला अनुसरून शिकवले जातात.

शाळेचे पाहिलं यशस्वी सत्र

पहिल्या वसंत ऋतूच्या (१ फेब्रुवारी ते १४ जून ) सत्रातील उपक्रम
  • शाळेचा शुभारंभ संपूर्ण नॉर्वे साठीफेब्रुवारी २०२५ (शनिवार) झाला.
  • Stavanger, Bergen, Trondheim, Sandefjord, Oslo आणि Eidsvoll येथील एकूण १३० विद्यार्थ्यांचा मराठीबोली नॉर्वे शाळेमध्ये सहभाग झाला.
  • मराठी बोली नॉर्वे शाळेचे १८ इच्छुक विद्यार्थ्यांचा सहभाग अमेरिकेच्या BMM शाळेच्या २०२५ च्या परीक्षेत झाला आणि ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.
 
  • विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया १ फेब्रुवारी ते १४ जून सत्रासाठी खालील वयोगट नुसार निश्चित केली गेली :-
  • शिशु वर्ग: ४ तेवर्षे वयाचे विद्यार्थी.
  • बाल वर्ग :- १ली ते ४थी – ६-१० वर्षे वयाचे विद्यार्थी.
  • किशोरवयीन:- ६ वी तेवी –  ११-१६ वर्षे वयाचे विद्यार्थी.
  • दर शनिवार: **ऑस्लो आणि स्टॅव्हांगर येथे ऑफलाइन मराठी शाळेचे वर्ग चालवले गेले.
  • **आणि इतर सर्व ठिकाणांसाठी प्रत्येक इयत्तेनुसार ऑनलाईन वर्ग उपलब्ध होते.
  • सोमवार ते शुक्रवार: १५ मिनिटांचे ऑनलाइन मराठी वर्ग, दररोज संध्याकाळी दोन वेळांमध्ये उपलब्ध होते. ( वेळ 5.30-5.45/ 8.00-8.15 pm)
Scroll to Top