मराठीबोली नॉर्वे शाळेची धोरणे

  • मराठी शाळेसाठी  नॉर्वेच्या राष्ट्रीय शाळेच्या सुट्ट्या कॅलेंडरचे पालन केले जाईल.
  • शाळेशी संबंधित सर्व प्रश्न कृपया फक्त खालील ईमेलवर पाठवा: mbs.Norge@gmail.com.
  •  शिकवणी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची बक्षिसे दिले जाणार नाही.
  • फेब्रुवारी २०२५ पासून शाळेच्या नाममात्र शुल्काची अंमलबजावणी केली जाईल.
  • विद्यार्थ्यांबद्दल कोणतेही मुद्दे पालक शिक्षकांमध्ये आयोजित पालकशिक्षक बैठकांमध्येच चर्चिले जातील.
  • विद्यार्थ्यांचे कालानुसार मूल्यांकन केले जाईल.
  • प्रत्येक वर्ग दीड तास चालेल, ज्यामध्ये दोन लहान विश्रांती असतील.
  • पालकशिक्षक बैठकांचे आयोजन वेळोवेळी केले जाईल.
  • सर्व वयाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेच्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रकल्प आयोजित केले जातील, ज्या मध्ये कविता वाचन, श्लोक, गोष्टींचे वाचन, मराठी पारंपरिक दिवस साजरे करणे, आणि मराठी खेळांचा समावेश असेल.
  • जर एखादा विद्यार्थी शाळेचा निरोप घेत असेल, तर पालकांनी ईमेलद्वारे सूचना द्याव्यात
  • वेळेवर आगमन महत्त्वाचे आहे. तसेच मराठी वर्गांसाठी विद्यार्थ्यांना वेळेवर सोडणे आणि घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • हवामानाच्या स्थितीनुसार Outdoor activity आयोजित केले जातील.
  • प्रत्येक वर्गाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल.
  • पालकशिक्षक संवाद फक्त पालकशिक्षक बैठकीत होईल.

मराठी शिकण्यासाठी कौटुंबिक सहकार्य

प्रिय पालक,

  • कृपया आपल्या मुलांना घरात मराठी बोलण्यास प्रोत्साहन द्यावे.
  • आपल्या मुलांना दररोज नवीन मराठी शब्द शिकवण्यास मदत करावी.
  • कृपया आपल्या मुलांना सुट्टीच्या दिवशी श्लोक म्हणण्यास किंवा गोष्ट सांगण्यास प्रोत्साहित करावे.
  • वाचन आणि लेखनासाठी अक्षर अ‍ॅप्सचा वापर करावा .
  • नियमित हजेरी महत्त्वाची आहे, कृपया मुलांना शाळेत वेळेवर पाठवावे.
  • कृपया आपल्या मुलांना पेन्सिल, रबर, स्केच पेन्सिल इत्यादी साहित्य सोबत द्यावे.
  • कृपया पूर्ण केलेले सर्व वर्कशीटस फोल्डरमध्ये एकत्र करून ठेवावेत, जेणेकरून नंतर तपासता येतील.आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
  • प्रत्येक वर्ग दीड तास चालेल, ज्यामध्ये दोन लहान विश्रांती असतील.
  • गृहपाठ आणि पुनरावलोकन आपल्या मुलाच्या शिकण्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
  • अतिरिक्त वर्कशीट्स आणि गृहपाठ ईमेलद्वारे पाठवले जातील; कृपया ते आपल्या मुलांनसाठी प्रिंट करून दयावी.
  • कृपया आपल्या मुलासोबत नाश्ता, फळं आणि पाण्याची बाटली पाठवावी.

शिशु वर्ग

बालभारती नी आखलेल्या अभ्यासक्रमानुसार शाळेत शिकवले जाते.ज्याच्यात BMM चा अभ्यासक्रम सुद्धा समाविष्ट आहे.
अभ्यासक्रमानुसार शिक्षकांनी बनविलेल्या अनेक मजेशीर उपक्रम त्यांच्या किशोरवयीन वयाला अनुसरून शिकवले जातात.

दररोज 15 मिनिटे ऑनलाइन शिकवण्याचे महत्त्व

वास्तविक अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी, सर्व वयाच्या गटातील विद्यार्थ्यांना मराठी अक्षरे आणि अंकांची मूलभूत माहिती शिकवली जाईल.
प्रत्येक सोमवार ते शुक्रवार १५ मिनिटांच्या सत्रामुळे मराठीची ओळख हळूहळू आणि तणावमुक्त पद्धतीने होईल.
दैनिक १५ मिनिटांच्या शिकवणी आणि पुनरावलोकनामुळे एक सोयीस्कर आणि आनंददायक शिक्षण वातावरण तयार होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. 
ऑनलाइन वर्गांमध्ये मुलांना प्रेरित आणि गुंतवून ठेवण्यासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक आहे.
Scroll to Top