BMM शाळेची पार्श्वभूमी
२००९ साली फिलाडेल्फिया इथे झालेल्या अमेरिकामधील BMM च्या अधिवेशनामध्ये मराठी शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिक्षणक्षेत्राचा अनुभव असलेल्या मान्यवरांनी मिळून,भारताबाहेर राहणाऱ्या मुलांनी मराठी शिकणे किती आवश्यक आहे हे जाणून सात ठिकाणी शाळा सुरु केल्या. शाळा म्हंटलं की त्यासाठी प्रत्येक इयत्तेनुसार निश्चित असा अभ्यासक्रम असायलाच हवा. याच भावनेतून शिक्षकांनी मिळून सखोल अभ्यासक्रम तयार केला. पुणे येथील भारती विद्यापीठ संस्थेकडून हा अभ्यासक्रम तपासून घेतला गेला आणि त्याला अधिकृत मान्यता प्राप्त केली . अश्याप्रकारे अनेक वेगवेगळ्या अमेरिकामधील शहरांमध्ये मराठी शाळा सुरु झाल्या.
BMM शाळेचे पुढचे पाऊल
२०२3 मध्ये BMM शाळेच्या स्वयंसेवक यांच्या एकत्रित प्रयत्नाने, BMM आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये करार झाला. ह्या कराराप्रमाणे अमेरिकामधील BMM शाळेमध्ये २०२४–२५ पासून पुढे बालभारती अभ्यासक्रम शिकवला गेला. २०२४ च्या आकडेवारीनुसार उत्तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आणि युनायटेड किंग्डम, डेन्मार्क,नॉर्वे या सहा देशात मिळून एकूण १०० शाळा सुरु आहेत. या शाळांमधून प्रत्येक इयत्तेनुसार पद्धतशीर शिक्षण दिले जाते. शाळा ही पूर्णपणे स्वयंसेवकांमार्फत चालवली जाते. त्याबदल्यात त्यांना कुठलाही आर्थिक मोबदला मिळत नाही. ऑगस्ट २०२५ पासून युरोप मध्ये ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क जुटलँड येथे देखील BMM उपक्रमातून मराठी शाळा सुरु होणार आहेत.
संयुक्त उपक्रम